• الْمَهْدِيُّ مِنِّي أَجْلَى الْجَبْهَةِ أَقْنَى الْأَنْفِ يَمْلَأُ الْأَرْضَ قِسْطًا وَ عَدْلًا كَمَا مُلِئَتْ جَوْرًا وَ ظُلْمًا يَمْلِكُ سَبْعَ سِنِينَ

    (سنن أبي داود الحديث رقم 4285)

    माहदी माझ्याकडून आहे. त्याला मोठे आणि तेजस्वी कपाळ आहे आणि लांब नाक आहे. तो पृथ्वीवरील सर्वांना न्याय देईल, कारण त्याच्या अगोदर पृथ्वी पाप आणि भ्रष्टाचाराने व्याप्त असेल. तो पृथ्वीवर सात वर्षे शासन करेल.

  • لَوْ لَمْ يَبْقَ مِنْ الدَّهْرِ إِلَّا يَوْمٌ لَبَعَثَ اللَّهُ رَجُلًا مِنْ أَهْلِ بَيْتِي يَمْلَؤُهَا عَدْلًا كَمَا مُلِئَتْ جَوْرًا

    (سنن أبي داود الحديث رقم 4283)

    जर जग एके दिवशी संपणार आहे, तर परमेश्वर त्या दिवशी माझ्या अहल अल-बायतचा एक मनुष्य खाली पाठवून देईल. तो उदासीनता आणि भ्रष्टाचाराने भरलेल्या या पृथ्वीवर न्याय आणेल.

  • لَا تَذْهَبُ الدُّنْيَا حَتَّى يَمْلِكَ الْعَرَبَ رَجُلٌ مِنْ أَهْلِ بَيْتِي يُوَاطِئُ اسْمُهُ اسْمِي

    (سنن الترمذي الحديث رقم 2230)

    माझ्या अहल अल-बायतकडील एक मनुष्य, ज्याचे नाव माझ्या नावाप्रमाणेच असेल, अरबांचे संचालन करेपर्यंत या जगाचा सर्वनाश होणार नाही.

  • يَلِي رَجُلٌ مِنْ أَهْلِ بَيْتِي يُوَاطِئُ اسْمُهُ اسْمِي

    (سنن الترمذي الحديث رقم 2231)

    माझ्या अहल अल-बायतकडून एक मनुष्य येईल, ज्याचे नाव माझ्या नावाप्रमाणेच असेल.

  • الْمَهْدِيُّ مِنَّا أَهْلَ الْبَيْتِ يُصْلِحُهُ اللَّهُ فِي لَيْلَةٍ

    (سنن ابن ماجه الحديث رقم 4085)

    माहदी माझ्या अहल अल-बायतमधून आहे. अल्ला त्याला एका रात्रीत पात्र बनवेल.

  • يَكُونُ فِي آخِرِ أُمَّتِي خَلِيفَةٌ يَحْثِي الْمَالَ حَثْيًا لَا يَعُدُّهُ عَدَدًا

    (صحيح مسلم الحديث رقم 2913)

    माझ्या लोकांच्या कालावधीच्या अखेरीस, एक खलिफा असेल, जो संपत्ती प्रदान करेल आणि तिला कधीही मोजणार नाही.

  • عَنْ أَبِي سَعِيدٍ الْخُدْرِيِّ قَالَ خَشِينَا أَنْ يَكُونَ بَعْدَ نَبِيِّنَا حَدَثٌ فَسَأَلْنَا نَبِيَّ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَقَالَ إِنَّ فِي أُمَّتِي الْمَهْدِيَّ يَخْرُجُ يَعِيشُ خَمْسًا أَوْ سَبْعًا أَوْ تِسْعًا زَيْدٌ الشَّاكُّ قَالَ قُلْنَا وَمَا ذَاكَ قَالَ سِنِينَ قَالَ فَيَجِيءُ إِلَيْهِ رَجُلٌ فَيَقُولُ يَا مَهْدِيُّ أَعْطِنِي أَعْطِنِي قَالَ فَيَحْثِي لَهُ فِي ثَوْبِهِ مَا اسْتَطَاعَ أَنْ يَحْمِلَهُ

    (سنن الترمذي الحديث رقم 2232)

    अबू सईद खेदरी (पैगंबरांचा एक अनुयायी) म्हणतो: पैगंबरांच्या मृत्युनंतर दुःखद प्रसंगांच्या घडण्याच्या आमच्या भीतीनंतर, आम्हाला या प्रश्नाविषयी विचारण्यास भाग पडले. पैगंबर म्हणाले: “माहदी माझ्या देशातून उगम पावेल. तो पाच, सात किंवा नऊ वर्षे राहील.” – हदीसचा कथनकार, झैदशी दाम्बंधित असलेला एकच संशय आहे. कथनकाराला माहदीच्या जीवनाच्या अचूक कालावधीविषयी आणि आकड्यांच्या सत्याविषयी विचारले होते. तो म्हणाला तो अनेक वर्षे जगेल. नंतर परमेश्वराच्या प्रेषिताने म्हटले की एखादी व्यक्ती त्याच्याकडे येईल आणि त्याला विचारेल: “हे माहदी! माझ्यावर कृपा कर.” आणि तो त्याला जेवढे तो वाहून नेऊ शकेल तेवढे सोने आणि चांदी देईल.

  • عَنْ عَبْدِ اللَّهِ قَالَ بَيْنَمَا نَحْنُ عِنْدَ رَسُولِ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ و َسَلَّمَ إِذْ أَقْبَلَ فِتْيَةٌ مِنْ بَنِي هَاشِمٍ فَلَمَّا رَآهُمْ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَ سَلَّمَ اغْرَوْرَقَتْ عَيْنَاهُ وَ تَغَيَّرَ لَوْنُهُ قَالَ فَقُلْتُ مَا نَزَالُ نَرَى فِي وَجْهِكَ شَيْئًا نَكْرَهُهُ فَقَالَ إِنَّا أَهْلُ بَيْتٍ اخْتَارَ اللَّهُ لَنَا الْآخِرَةَ عَلَى الدُّنْيَا و َإِنَّ أَهْلَ بَيْتِي سَيَلْقَوْنَ بَعْدِي بَلَاءً وَ تَشْرِيدًا وَ تَطْرِيدًا حَتَّى يَأْتِيَ قَوْمٌ مِنْ قِبَلِ الْمَشْرِقِ مَعَهُمْ رَايَاتٌ سُودٌ فَيَسْأَلُونَ الْخَيْرَ فَلَا يُعْطَوْنَهُ فَيُقَاتِلُونَ فَيُنْصَرُونَ فَيُعْطَوْنَ مَا سَأَلُوا فَلَا يَقْبَلُونَهُ حَتَّى يَدْفَعُوهَا إِلَى رَجُلٍ مِنْ أَهْلِ بَيْتِي فَيَمْلَؤُهَا قِسْطًا كَمَا مَلَئُوهَا جَوْرًا فَمَنْ أَدْرَكَ ذَلِكَ مِنْكُمْ فَلْيَأْتِهِمْ وَلَوْ حَبْوًا عَلَى الثَّلْجِ

    (سنن ابن ماجه الحديث رقم 4082)

    अब्दुल्ला लिहितात की जेव्हा आम्ही परमेश्वराच्या प्रेषितासमोर (पीबीयूएच) बसलो होतो, तेव्हा बानू हाशीम युवाचा एक समूह बाजूने गेला. जेव्हा पैगंबरांनी (पीबीयूएच) त्यांना पाहिले, तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्यांचा चेहरा निस्तेज झाला. आम्ही म्हणालो: “हे पैगंबर! तुम्हाला दुःखी आणि वेदनेत पाहण्याची आम्ही कधीही इच्छा करत नाही.” पैगंबरांनी उत्तर दिले: “आपण एक कुटुंब आहोत ज्यांच्यासाठी परमेश्वर शक्तिशालीने या जगाची नंतर देखभाल करण्याचे पसंत केले आहे. माझ्या मृत्युनंतर, अहल अल-बायतला दुःख आणि विस्थापन भोगावे लागेल आणि हाकलले जाईल. त्यामुळे ते आमच्यासाठी लढतील आणि त्यांना मदत मिळेल आणि त्यांना जे पाहिजे ते दिले जाईल. परंतु, माझ्या अहल अल-बायतमधून एका मनुष्याकडे प्रकरण सोपवल्याखेरीज ते याला स्वीकारणार नाहीत. तो जग न्यायाने भरेल कारण हे इतरांद्वारे जुलूम आणि भ्रष्टाचाराने भरलेले असेल. त्यामुळे, त्या वेळी राहणारा तुमच्यापैकी प्रत्येक जण त्यांच्याकडे धावेल जरी तुम्हाला बर्फावर रंगत जावे लागत असेल.

  • لَا تَزَالُ طَائِفَةٌ مِنْ أُمَّتِي يُقَاتِلُونَ عَلَى الْحَقِّ ظَاهِرِينَ إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ قَالَ فَيَنْزِلُ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ فَيَقُولُ أَمِيرُهُمْ تَعَالَ صَلِّ لَنَا فَيَقُولُ لَا إِنَّ بَعْضَكُمْ عَلَى بَعْضٍ أُمَرَاءُ تَكْرِمَةَ اللَّهِ هَذِهِ الْأُمَّةَ

    (صحيح مسلم الحديث رقم 156)

    माझ्या देशाचा एक समुदाय न्यायदिनापर्यंत निरंतरपणे सत्यासाठी लढेल, जेव्हा इसा इब्न मरयमला (पैगंबर जीसस) खाली पाठवले जाईल आणि विश्वासू समुहाचा शासक इसाला सांगेल: “आमच्यासोबत प्रार्थना कर (कृपया आमच्या प्रार्थनेसाठी इमाम बन).” आणि इसाने उत्तर दिले: “नाही! तुमच्यापैकी काही जण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहात, कारण या राष्ट्राचा आदर करण्याची परमेश्वराची इच्छा आहे.

  • نَحْنُ وَلَدَ عَبْدِ الْمُطَّلِبِ سَادَةُ أَهْلِ الْجَنَّةِ أَنَا و َحَمْزَةُ وَ عَلِيٌّ وَ جَعْفَرٌ و َالْحَسَنُ وَ الْحُسَيْنُ وَ الْمَهْدِيُّ

    (سنن ابن ماجه الحديث رقم 4087)

    आम्ही अब्दुल-मुत्तलिबचे वंशज आहोत: मी, हमझा, अली, जाफर, हासन, हुसैन आणि माहदी.

  • الْمَهْدِيُّ مِنِّي

    (سنن أبي داود الحديث رقم 4285)

    माहदी माझा आहे.

  • الْمَهْدِيُّ مِنْ عِتْرَتِي مِن ْوَلَدِ فَاطِمَةَ

    (سنن أبي داود الحديث رقم 4284)

    माहदी माझा आप्त आहे आणि फातीमाची संतती आहे.

  • الْمَهْدِيُّ مِن ْوَلَدِ فَاطِمَةَ

    (سنن ابن ماجه الحديث رقم 4086)

    माहदी फातीमाची एक संतती आहे.

  • قَامَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ يَوْمًا فِينَا خَطِيبًا بِمَاءٍ يُدْعَى خُمًّا بَيْنَ مَكَّةَ وَالْمَدِينَةِ فَحَمِدَ اللَّهَ وَ أَثْنَى عَلَيْهِ و وَعَظَ و ذَكَّرَ ثُمَّ قَالَ أَمَّا بَعْدُ أَلَا أَيُّهَا النَّاسُ فَإِنَّمَا أَنَا بَشَرٌ يُوشِكُ أَنْ يَأْتِيَ رَسُولُ رَبِّي فَأُجِيبَ و أَنَا تَارِكٌ فِيكُمْ ثَقَلَيْنِ أَوَّلُهُمَا كِتَابُ اللَّهِ فِيهِ الْهُدَى و النُّورُ فَخُذُوا بِكِتَابِ اللَّهِ وَ اسْتَمْسِكُوا بِهِ فَحَثَّ عَلَى كِتَابِ اللَّهِ وَ رَغَّبَ فِيهِ ثُمَّ قَالَ و أَهْلُ بَيْتِي أُذَكِّرُكُمْ اللَّهَ فِي أَهْلِ بَيْتِي أُذَكِّرُكُمْ اللَّهَ فِي أَهْلِ بَيْتِي أُذَكِّرُكُمْ اللَّهَ فِي أَهْلِ بَيْتِي

    (صحيح مسلم الحديث رقم 2408)

    एके दिवशी अल्लाचा संदेशवाहू (पीबीयूएच) “खूम” नावाच्या पाणवठ्याजवळ उभा राहिला, जो मक्का आणि मदिनाच्या मध्यभागी वसलेला होता, आणि श्रोत्यांना प्रवचन दिले. परमेश्वराची प्रशंसा केल्यानंतर आणि सल्ले दिल्यावर आणि स्मरण करून दिल्यावर, म्हणाला, “लोकहो! खरं म्हणजे मी काहीही नाही, पण एक मानव आहे आणि एक दैवी संदेशवाहक माझा आत्मा घेऊन जाण्यास येणार आहे आणि त्याचे आमंत्रण मी स्वीकारेन. मी दोन अमुल्य गोष्टी तुमच्यासाठी सोडून जातो. पहिले म्हणजे परमेश्वराचे पुस्तक, ज्याचे तुम्ही पालन केले पाहिजे आणि धारण केले पाहिजे.” नंतर पैगंबरांनी अल्लाच्या पुस्तकाबद्दल अनेक शिफारशी दिल्या आणि लोकांना त्यांच्या आदेशांचे पालन करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तो बोलला: “आणि माझे कुटुंब! मी माझ्या कुटुंबाच्या हक्कांची तुम्हाला येथे आठवण करून देतो.” नंतरच्या वाक्याची त्यांनी तीनदा पुनरावृत्ती केली.

  • إِنِّي تَارِكٌ فِيكُمْ مَا إِنْ تَمَسَّكْتُمْ بِهِ لَنْ تَضِلُّوا بَعْدِي أَحَدُهُمَا أَعْظَمُ مِنْ الْآخَرِ كِتَابُ اللَّهِ حَبْلٌ مَمْدُودٌ مِنْ السَّمَاءِ إِلَى الْأَرْضِ وَعِتْرَتِي أَهْلُ بَيْتِي وَلَنْ يَتَفَرَّقَا حَتَّى يَرِدَا عَلَيَّ الْحَوْضَ فَانْظُرُوا كَيْفَ تَخْلُفُونِي فِيهِمَا

    (سنن الترمذي الحديث رقم 3788)

    मी तुमच्यासाठी दोन गोष्टी सोडून जातो, ज्यामुळे तुम्ही त्यांना पकडून ठेवाल आणि तुमची दिशाभूल होणार नाही. पहिली गोष्ट दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे; ते परमेश्वराचे पुस्तक आहे, जे आकाशातून लटकणाऱ्या दोरीप्रमाणे आहे आणि दुसरे माझे अहल अल-बायत आहे. या दोन्ही मूल्यवान गोष्टी वेगळ्या केल्या जाऊ शकणार नाहीत आणि स्वर्गात मला येऊन मिळतील. माझ्या भरवश्याच्या तुमच्या हाताळणीबद्दल काळजी घ्या.

  • خَرَجَ النَّبِيُّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ غَدَاةً وَعَلَيْهِ مِرْطٌ مُرَحَّلٌ مِنْ شَعْرٍ أَسْوَدَ فَجَاءَ الْحَسَنُ بْنُ عَلِيٍّ فَأَدْخَلَهُ ثُمَّ جَاءَ الْحُسَيْنُ فَدَخَلَ مَعَهُ ثُمَّ جَاءَتْ فَاطِمَةُ فَأَدْخَلَهَا ثُمَّ جَاءَ عَلِيٌّ فَأَدْخَلَهُ ثُمَّ قَالَ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا

    (صحيح مسلم الحديث رقم 2424)

    परमेश्वराच्या संदेशवाहकाने काळ्या केसांचा नमुनेदार डगला घालून सकाळी घर सोडले. हासन इब्न अली आला आणि पैगंबरांनी त्याला त्याच्या डगल्याखाली घेतले. नंतर हुसैन आला आणि त्याला देखील त्यांनी डगल्याखाली घेतले. नंतर फातिमा आली आणि पैगंबरांनी तिला झाकले आणि नंतर अली आला आणि तो डगल्याखाली गेला. नंतर त्यांनी आयत ऐकवले.

    “قَالَ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا”

    “अल्ला केवळ तुमच्यातून अशुद्धपणा [पापाचा] बाहेर काढू इच्छितो, कुटुंबातील [पैगंबरांच्या] लोकांनो, आणि [व्यापक स्तरावर] शुद्धीकरणासह तुम्हाला शुद्ध करणे.”

  • لَمَّا نَزَلَتْ هَذِهِ الْآيَةُ فَقُلْ تَعَالَوْا نَدْعُ أَبْنَاءَنَا و َأَبْنَاءَكُمْ دَعَا رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَ سَلَّمَ عَلِيًّا وَ فَاطِمَةَ وَ حَسَنًا وَ حُسَيْنًا فَقَالَ اللَّهُمَّ هَؤُلَاءِ أَهْلِي

    (صحيح مسلم الحديث رقم 2404)

    जेव्हा आयत “فَقُلْ تَعَالَوْا نَدْعُ أَبْنَاءَنَا و َأَبْنَاءَكُمْ” “आपल्या वारसाला बोलवूया आणि तू तुमच्या वारसांना बोलव”द्वारा बोलावण्यात आले, तेव्हा पैगंबर मुहम्मदनी (पीबीयूएच) अली, फातिमा, हासन आणि हुसैन यांना बोलावून म्हणाले: “प्रिय परमेश्वर! हे खरच माझे अहल अल-बायत आहेत.”

  • مَّا نَزَلَتْ هَذِهِ الْآيَةُ عَلَى النَّبِيِّ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَ سَلَّمَ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَ يُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا فِي بَيْتِ أُمِّ سَلَمَةَ فَدَعَا فَاطِمَةَ وَ حَسَنًا وَ حُسَيْنًا فَجَلَّلَهُمْ بِكِسَاءٍ وَ عَلِيٌّ خَلْفَ ظَهْرِهِ فَجَلَّلَهُ بِكِسَاءٍ ثُمَّ قَالَ اللَّهُمَّ هَؤُلَاءِ أَهْلُ بَيْتِي فَأَذْهِبْ عَنْهُمْ الرِّجْسَ وَ طَهِّرْهُمْ تَطْهِيرًا قَالَتْ أُمُّ سَلَمَةَ وَ أَنَا مَعَهُمْ يَا نَبِيَّ اللَّهِ قَالَ أَنْتِ عَلَى مَكَانِكِ وَ أَنْتِ عَلَى خَيْرٍ

    (سنن الترمذي الحديث رقم 3205)

    जेव्हा आयत, “ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا” “परमेश्वर वस्तुतः दृष्ट शक्ती आणि दुराचार तुमच्या कुटुंबापासून दूर ठेऊ इच्छित असतो आणि त्याला तुम्हाल पूर्णपणे शुद्ध करायचे असते” पैगंबर मुहम्मदकडे (पीबीयूएच) पाठवण्यात आला होता, तेव्हा ते उम्म-सलमाच्या घरात होते. त्यांनी नंतर फातिमा, हासन आणि हुसैनला बोलावले आणि त्यांना आपल्या डगल्याखाली घेतले. नंतर त्यांनी अलीला त्यांच्या डगल्याखाली घेतले, जो त्यांच्या मागे उभा होता. नंतर ते म्हणाले, “हे परमेश्वरा! हे सर्व माझे अहल अल-बायत आहेत. म्हणून त्यांना कोणत्याही दृष्ट शक्तीपासून आणि विघ्नापासून मुक्त कर आणि त्यांना शुद्ध आणि स्वच्छ कर.” नंतर उम्म-सलमाने विचारले: “हे अल्लाच्या संदेशवाहका! मी पण त्यांच्यापैकी एक आहे का?” पैगंबरांनी उत्तर दिले: “तुझ्याकडे तुझी स्वतःची जागा आहे आणि तू चांगलेपणा आणि पुण्यवान जीवन जगते (पण तू या समुहाचा भाग नाहीस.”

  • أَنَّ رَسُولَ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَ سَلَّمَ كَانَ يَمُرُّ بِبَابِ فَاطِمَةَ سِتَّةَ أَشْهُرٍ إِذَا خَرَجَ إِلَى صَلَاةِ الْفَجْرِ يَقُولُ الصَّلَاةَ يَا أَهْلَ الْبَيْتِ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَ يُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا

    (سنن الترمذي الحديث رقم 3206)

    सकाळच्या नमाजसाठी मशिदीस येण्यापूर्वी सहा महिन्यांसाठी, पैगंबर मुहम्मद (पीबीयूएच) फातिमाच्या घराच्या दारावर आले आणि म्हटले: “हे अहल अल-बायत! ही प्रार्थनेची वेळ आहे” (नंतर त्यांनी कुराणच्या आयतांचे पठण सुरु केले)

    ِانَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُذْهِبَ عَنْكُمْ الرِّجْسَ أَهْلَ الْبَيْتِ وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا

    (वास्तविक अल्ला तुमच्या मधून अशुद्धता (पापाची) हटवू इच्छितो, हे कुटुंबातील (पैगंबरांच्या) लोकांनो, आणि शुद्धीकरणासह शुद्ध करण्यासाठी [व्यापक स्तरावर])

  • عن عَامِرِ بن سَعْدِ بن أبي وَقَّاصٍ قال كَتَبْتُ إلى جَابِرِ بن سَمُرَةَ مع غُلَامِي نَافِعٍ أَنْ أَخْبِرْنِي بِشَيْءٍ سَمِعْتَهُ من رسول اللَّهِ صلي الله عليه وآله قال فَكَتَبَ إلي سمعت رَسُولَ اللَّهِ صلي الله عليه وآله يوم جُمُعَةٍ عَشِيَّةَ رُجِمَ الْأَسْلَمِيُّ يقول: لَا يَزَالُ الدِّينُ قَائِمًا حتى تَقُومَ السَّاعَةُ أو يَكُونَ عَلَيْكُمْ اثْنَا عَشَرَ خَلِيفَةً كلهم من قُرَيْشٍ

    (صحيح مسلم الحديث رقم 1822)

    आमेर इब्न आबी वकास म्हणतात: माझा गुलाम आणि मी जाबेर इब्न सामुरेह यांना लिहिले आणि परमेश्वराच्या संदेशवाहकाकडून (पीबीयूएच) त्याने काय ऐकले ते कळविण्यास सांगितले. जाबेरने लिहिले की शुक्रवारी रात्री जेव्हा अस्लामीकडे दगड फेकण्यात आला, तेव्हा त्याने पैगंबर मुहम्मदना असे म्हणताना ऐकले: न्याय दिनापर्यंत हा धर्म मजबुतपणे उभा राहील आणि तुमच्याकडे बारा खलिफा असतील, ज्यांच्यापैकी सर्व कुरैशमधून असतील.

  • سَمِعْتُ جَابِرَ بْنَ سَمُرَةَ قَالَ سَمِعْتُ النَّبِىَّ صلى الله عليه وسلم يَقُولُ يَكُونُ اثْنَا عَشَرَ أَمِيرًا فَقَالَ كَلِمَةً لَمْ أَسْمَعْهَا فَقَالَ أَبِى إِنَّهُ قَالَ كُلُّهُمْ مِنْ قُرَيْشٍ

    (صحيح البخاري الحديث رقم 6796)

    “बारा अमीर (राजकुमार) असतील.” नंतर ते (पैगंबर) असे काही म्हणाले, ते मी ऐकले नाही, पण माझ्या वडिलांनी सांगितले: “आणि पैगंबर म्हणाले की ते सर्व जण कुरैश जमातीमधील होते.”

  • عن جَابِرِ بن سَمُرَةَ قال: دَخَلْتُ مع أبي على النبي صلى الله عليه وسلم فَسَمِعْتُهُ يقول: إِنَّ هذا الْأَمْرَ لَا يَنْقَضِي حتى يَمْضِيَ فِيهِمْ اثْنَا عَشَرَ خَلِيفَةً. قال: ثُمَّ تَكَلَّمَ بِكَلَامٍ خَفِيَ عَلَيَّ قال: فقلت لِأَبِي: ما قال؟ قال: كلهم من قُرَيْشٍ

    (صحيح مسلم الحديث رقم 1821)

    जाबेर इब्न सामुरेह म्हणतात: मी माझ्या वडिलांसमवेत पैगंबर मुहम्मदांकडे पोचलो. आम्ही त्यांना असे म्हणताना ऐकले: “बारा उत्तराधिकारी मुस्लिमांवर संचालन करेपर्यंत इस्लामिक खलिफात संपणार नाही.” नंतर त्यांनी काही शब्द पुटपुटले जे मी ऐकू शकलो नाही. मी माझ्या वडिलांना विचारले: “पैगंबरांनी काय सांगितले?” माझ्या वडिलांनी उत्तर दिले: “ते म्हणाले: हे सर्व खलिफा कुरैश आहेत.”